Sunday, April 10, 2011

नाना रचना जीर्ण जर्जर । त्यांचे करावे जीर्णोद्धार ॥



डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाकरिता ५ कोटीची तरतूद - जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे

शनिवार, २ एप्रिल, २०११

महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी रायगड जिल्हा नियोजन मंडळाकडून 

यावर्षी सुमारे ५ कोटीची तरतूद करण्यात आली असून उर्वरित कामासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल, 

अशी माहिती जलसपंदा मंत्री सुनिल तटकरे यांनी दिली.

अलिबाग तालुक्यातील मौजे वढाव खुर्द येथे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी 

व भूमिपुजन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत पालकमंत्री श्री.तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात 

आली. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ना.तटकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या राष्ट्रीय 

स्मारकासाठी एकूण १० कोटी मंजूर केले असून या वर्षी ५ कोटी मंजूर करण्यात आले आहे व उर्वरित 

स्मारकाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात येईल.

किमान दोन वर्षात स्मारकाचे काम पूर्ण होईल. नानासाहेब धर्माधिकारी यांचे ग्रंथांची संग्राहलयात जपणूक 

केली जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार दिपस्तंभाप्रमाणे उभे 

रहावे. दि.९ एप्रिल २०११ रोजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार व 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष पाटील व 

पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहितीही श्री. तटकरे यांनी यावेळी दिली. 

------------------------------------------------------------------------------------------------------------



वरील दोन्ही बातम्या मी वाचल्या त्यावरुन माझे विचार मांडत आहे. 

प्रथम म्हणजे श्रीसमर्थांनी दासबोध रचला ते स्थळ शिवथर घळ धन्य होत. सध्या त्या स्थळाचा पण 

जीर्णोध्दार आवश्यक आहे. कै. देव यांनी शिवथर घळीचा शोध घेतला आणि सघ्या समर्थ सेवा मंडळ आणि 

सुंदरमठ संस्थान यांच्या विद्यमाने तेथील कारभार सांभाळला जातो. स्वत: समर्थांनी दासबोधात म्हणले 

आहे, “ नाना रचना जीर्ण जर्जर । त्यांचे करावे जीर्णोद्धार । पडिलें कार्य तें सत्वर । चालवित जावें ॥ ”

अर्थात समर्थ भक्तांना आणि दासबोध अभ्यासकांना हे माहितच असणार आणि हे पण आहे की समर्थांच्या 

निर्याण्या वेळी देखील समर्थांनी शिष्यांना सांगितले होते कि माझे मंदिर बांधण्यापेक्षा राघवाची कीर्ति वाढवा, 

त्याचे मंदिर बांधा पण भक्तांच्या श्रध्देने सज्जनगडावर श्रीसमर्थांचे समाधी मंदिर आणि श्रीराम मंदिर दोन्ही 

निर्माण झाले. तसेच रामदास स्वामींचा मठ. आज चाफळ, सज्जनगड, शिवथर घळ आणि समर्थांची 

जन्मभुमी जांब समर्थ ह्या सर्व ठिकाणी समर्थांचे विचार जतन करण्यासाठी जीर्णोध्दाराची आवश्यकता आहे. 

हे उघड सत्य असताना आपले मंत्री आणि समर्थ भक्त गण हे का विसरत आहेत. 

माझ्या मते श्रीसमर्थ हेच सदगुरु आहेत. समर्थ बैठकीतून समाजप्रबोधन करणारे नानासाहेब धर्माधिकारी 

पण थोरच आहेत. त्याच प्रमाणे के. वि. बेलसरे यांचे नाव पण आपण विसरत आहोत. त्यांनी पण 

दासबोधाचे उत्तम निरुपण आपल्याला दिले आहे तसेच सुनील चिंचोळ्कर यांची पण दासबोध प्रवचने आहेत 

असे असून आपण कोणाचे महात्म्य वाढवायचे हे सर्वस्वी भक्तांच्या हाती आहे. 

दुसरी गोष्ट म्हणजे दुसर्‍या छायाचित्रात डोंबिवली मध्ये जो कार्यक्रम झाला त्यातील समर्थ भक्तांचीं सख्या श्री 

समर्थ सेवा कार्यासाठी एकत्र आली आणि संघटित झाली तर चांगला समाज आणि राष्ट्र निश्चित निर्माण होऊ 

शकतो.

कालचा लोकमत, आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये पण रेवदंडा, अलिबाग येथील जनसमुदायाचा लोट पाहून हेच मनात येते की एकत्र आलो तर निश्चीत चांगले कार्य सांधता येईल आणि तशी बुध्दी रामरायाकडे मागतो. 

जय जय रघुवीर समर्थ !!!

( कोणाच्या भावना यात दुखावल्या गेल्यास क्षमस्व: )