Thursday, November 25, 2010

मुंबईत २६/११ मधील हुतात्म्यांना आदरांजली.

श्रीराम समर्थ !!!    

मुंबईत २६/११ मधील हुतात्म्यांना आदरांजली. कायदा व सुव्यवस्था झ॒क॒ मारत आहे आता कायदा हातात घेऊ आणि किमान आज तरी त्या क॒सा॒ब॒ (सरकारी पाहुण्याची) ठासु. पहिले त्या इटलीच्या सोनियाची च xxxx, कॉंग्रेस व त्यांना निवडून देणार्‍याचींच ठासु !




मुंबई - मुंबईवरील सर्वात भीषण २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज (शुक्रवार) दोन वर्षे पूर्ण झाली असून, सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस जिमखान्यावर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम उपस्थित होते. पोलिसांनी ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेलपासून गिरगावपर्यंत संचलन करत शक्तीप्रदर्शन केले.

दहशतवाद्यांचे लक्ष्य असलेल्या ट्रायडेंट हॉटेलपासून पोलिसांचे संचलन सुरू झाले. यापुढे कोणत्याही प्रकारच्या हल्ला झाला, तरी त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल हेच त्यातून दाखविण्यात आले. संचलनात फोर्स वन, क्विक रिस्पॉन्स टीम आणि मुंबई पोलिस सहभागी झाले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सलामी दिल्यानंतर मरीन ड्राईव्ह मार्गाने गिरगावपर्यंत संचलन करण्यात आले.

या संचलनामध्ये अत्याधुनिक दहशतवादाविरुद्ध मुकाबला करण्याची क्षमता असलेली वाहने आणि शस्त्रांस्त्रांचेही प्रदर्शन करण्यात आले. ग्रेट वॉल ऑफ मुंबई, असे घोषवाक्य असलेला ट्रायडेंट हॉटेलपासून सुमारे १.३ किलोमीटर लांबीचा कापडी फलक, मुंबईतील शेकडो मुलांनी उचलून धरला होता.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, अल्पसंख्याक व्यवहारमंत्री अरीफ नसीम खान, पोलिस महासंचालक डी. शिवानंदन, मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव दयाळ या प्रसंगी उपस्थित होते.
हे सर्व झाले हो पण खरी श्रद्धांजली त्यांना तेव्हाच मिळेल जेव्हा हे सोनिया चे काँग्रेस जेव्हा त्यांचा खास अतिथी अ॒ज॒म॒ल॒ क॒सा॒ब॒ आणि त्याचे पळून गेलेले व छुपे साथीदार जेव्हा मृत्युदंड भोगतील.

मुळात सरकार आणि कायदा व सुव्यवस्था झक मारत आहे आणि त्यात २६/११ चा प्रसंग ओढवलेले सर्व मुंबईकर पुरावे असताना त्या हरामखोर कसाब ला सरकारी वकील मिळतो हेच मुळात संतापजनक आहे, त्याच्या कडून कबुली जवाब आलाना, प्रत्यक्ष पोलीस दलाने ने आणि कायद्याने पण तो हल्ला भोगला ना मग आता पुरावे गोळा करत बसण्यापेक्षा आणि कसाबचा सरकारी वकील उच्च न्यायालयात जाण्या आधी त्याला सर्व मुंबईकरांच्या हवाली करा, एवढ्या लोकांचा बळी जाऊन देखील अजमल कसाब सारखा दहशतवादी जर भारताचा अतिथी म्हणून गौरवत असेल तर मुळात असे हरामखोर सरकार निवडून देणारे हि एक दहशतवादीच ठरतात. जागे व्हा आज २ वर्ष झालीत आता तरी जागे व्हा !!!

निद्रेत राहिलोत, वास्तव परिस्थिती कायमस्वरूपी निद्रेत पाठवेल !!!

श्रीराम समर्थ !!!    

Monday, November 15, 2010

काय म्हाराजा, कुट नौकरी करायचा इचार आला कि काय मनात !!!

श्री समर्थ रामदास स्वामींना वंदन करून..................

काय म्हाराजा, पेपर मंदी काय वाचत हाय ! कुट नौकरी करायचा इचार आला कि काय मनात,
बर बर मग एक सांगतुया काय मी एक वर्तमानपत्र वाचलया त्यात व्हती येक मोट्टी जाहिरात म्हणे कोण्या येका कंपनीला कामगार हवेत, पात्रता (शिक्षण) काय बी चालल पन काम काय ते नाय दिला आणि मंग सहज गेलोया बगुया काय म्हने ती कंपनी.

मुलाखती साठी घेतली व्हती मोट्टी शाळा आणि त्यासाठी लई पोर झाली व्हती गोळा, अगदी बघा १० वी, १२ वी, आय. टी. आय अन पदवी (पडली बघ) धर असे सगळे जमल्यात. सगल्यांना शाळेत बुलावले म्हंजी नियम तर तिथही लागू व्हनारच म्हना मंग लाईनीन हुबी केली समद्यांना त्याच्या पात्रतेनुसार, मंग मेंढीच्या कळपागत समद्यांना बशिवल येकेका वर्गात आणि कंपनीची वोळख करून दिली, मंग बडबड आमची कंपनी कशी मोट्टी हाय तुम्ही हिथ कामाला लागला तर भविष्य उज्ज्वल, च्या मारी मी म्हनालो लाई झाक व्हील आपली निवड झाली तर !

आता या तर नी केला सगळा घोटाळा, समद्या पोरामंदून निवडणार फक्त २००-३०० आणि गम्मत काय बघा येवढी ढोर गोळा झालीय पन खरूखर त्ये शिक्षनाच्या आईचा घो केला न त्येच झाले आणि केले त्या कंपनीने कारण कंपनीची वोळख करून दिली आणि मंग कामाची माहिती व कालावधी सांगितला आणि या समद्या ढोरांची अक्कल समजली बघा ह काम xxxx, समद्या शिफ्ट मंदी अदलून-बदलून, येळ ८-९ तासच बाकी सुविधा लई झाक कॅन्टीन, बस आणि मेडीकल यापुढची गम्मत म्हंजी काम जे मिळणार त्ये हाय "कंत्राटी" म्हंजी या समद्या ढोरामंदी त्यांची परीक्षा उत्तीर्ण व्होउन मुलाखतीत निवडलेल्या ढोरांना फक्त ७ महीन काम करायला भेटणार मंग होतुंय कि न्हाई पोपट समद्या ढोरांचा, येवढी नामांकित कंपनी पन ती भी अशी वागतीय म्हणल्यावर मला सांग म्हाराजा या ढोरांना कायमची नौकरी मिळणार का ?

याचा अर्थ काय ७ महीन काम केल्यानंतर बस्तुया घरी आयता खाया किंवा होतुय चोर मवाली आनी फक्त हितच न्हाई तर समद्या ठिकाणी असंच चालंया आपली सरकार आणी काही खाजगी कंपन्या या कंत्राटी कामगार भरत राहिल्या तर साध्या लहान खेड्या मंदून त्ये मोट्ट्या शहरापर्यंत या समद्या शिक्षित / अर्धशिक्षित / अशिक्षित पोरांना त्याचं प्वॉट भरण्याकरता जागा आणि मौका राहणार का ? एकीकडे सरकार चालवती सर्व शिक्षा अभियान पन मी म्हनतुया या सरकारला अन अशा कंपन्यांना भी त्या अभियानात बशिवले पाहिजे आनि चांगली शिक्षा केली पाहिजे !!

बर तिथ काम केल्याच्या अनुभवावर दूसरीकड आपल्याला घ्येनार का कामासाठी नाही न मंग येवढी मोट्टी जाहिरात देऊन बऱ्याच पोरांना ख्वोट आमिष दाखवून का बर लुबाडायच आणि त्यातुं कमाई पन काही फार न्हाई आनि बाहेरून येणार्र्या पोरांना परत राहयसाठी जागा अन येक वेळच जेवण याचा खर्च कोण भागवणार, उर्र्मट फक्त पोर नसत्यात तर ही जादा शिकलेली ढोर भी असत्यात त्यामुळे जनजागृती बरोबर सरकार आणि नोकरदार यांची जागृती पन व्हायलाच पाहिजे नाहीतर येव्हड्या मोट्ट्या देशात त्या नागरीकांनसाठीच नोकरी अन धंदा राहणार न्हाई मंग गुन्हेगार आपल्या पासून लांब न्हाई आनि व्हो मूर्ख बनतो तो तर मूर्ख ठरतोच पन त्याला मूर्ख करणारा लई महामूर्ख असतोया

बर आता मुलाखत संपलिया, अंन कागुद हातात भेटलाय मला बाबा हिंग्रजी येत न्हाय मंग वाचा बरे त्या कागुदावर काय खरडलंय, तुमच्या कड पाठवतुया त्यो कागुद वाचा अंन मला सांगा म्हाराजा काय हाय ते ! तोवर ६ महीन उलटून गेल्यात अंन म्या दूसरीकड पुन्हा अशा कंत्राटी काम देणाऱ्या कंपनीच्या शोधात जातुया .......................