श्री समर्थ रामदास स्वामींना वंदन करून..................
काय म्हाराजा, पेपर मंदी काय वाचत हाय ! कुट नौकरी करायचा इचार आला कि काय मनात,
बर बर मग एक सांगतुया काय मी एक वर्तमानपत्र वाचलया त्यात व्हती येक मोट्टी जाहिरात म्हणे कोण्या येका कंपनीला कामगार हवेत, पात्रता (शिक्षण) काय बी चालल पन काम काय ते नाय दिला आणि मंग सहज गेलोया बगुया काय म्हने ती कंपनी.
मुलाखती साठी घेतली व्हती मोट्टी शाळा आणि त्यासाठी लई पोर झाली व्हती गोळा, अगदी बघा १० वी, १२ वी, आय. टी. आय अन पदवी (पडली बघ) धर असे सगळे जमल्यात. सगल्यांना शाळेत बुलावले म्हंजी नियम तर तिथही लागू व्हनारच म्हना मंग लाईनीन हुबी केली समद्यांना त्याच्या पात्रतेनुसार, मंग मेंढीच्या कळपागत समद्यांना बशिवल येकेका वर्गात आणि कंपनीची वोळख करून दिली, मंग बडबड आमची कंपनी कशी मोट्टी हाय तुम्ही हिथ कामाला लागला तर भविष्य उज्ज्वल, च्या मारी मी म्हनालो लाई झाक व्हील आपली निवड झाली तर !
आता या तर नी केला सगळा घोटाळा, समद्या पोरामंदून निवडणार फक्त २००-३०० आणि गम्मत काय बघा येवढी ढोर गोळा झालीय पन खरूखर त्ये शिक्षनाच्या आईचा घो केला न त्येच झाले आणि केले त्या कंपनीने कारण कंपनीची वोळख करून दिली आणि मंग कामाची माहिती व कालावधी सांगितला आणि या समद्या ढोरांची अक्कल समजली बघा ह काम xxxx, समद्या शिफ्ट मंदी अदलून-बदलून, येळ ८-९ तासच बाकी सुविधा लई झाक कॅन्टीन, बस आणि मेडीकल यापुढची गम्मत म्हंजी काम जे मिळणार त्ये हाय "कंत्राटी" म्हंजी या समद्या ढोरामंदी त्यांची परीक्षा उत्तीर्ण व्होउन मुलाखतीत निवडलेल्या ढोरांना फक्त ७ महीन काम करायला भेटणार मंग होतुंय कि न्हाई पोपट समद्या ढोरांचा, येवढी नामांकित कंपनी पन ती भी अशी वागतीय म्हणल्यावर मला सांग म्हाराजा या ढोरांना कायमची नौकरी मिळणार का ?
याचा अर्थ काय ७ महीन काम केल्यानंतर बस्तुया घरी आयता खाया किंवा होतुय चोर मवाली आनी फक्त हितच न्हाई तर समद्या ठिकाणी असंच चालंया आपली सरकार आणी काही खाजगी कंपन्या या कंत्राटी कामगार भरत राहिल्या तर साध्या लहान खेड्या मंदून त्ये मोट्ट्या शहरापर्यंत या समद्या शिक्षित / अर्धशिक्षित / अशिक्षित पोरांना त्याचं प्वॉट भरण्याकरता जागा आणि मौका राहणार का ? एकीकडे सरकार चालवती सर्व शिक्षा अभियान पन मी म्हनतुया या सरकारला अन अशा कंपन्यांना भी त्या अभियानात बशिवले पाहिजे आनि चांगली शिक्षा केली पाहिजे !!
बर तिथ काम केल्याच्या अनुभवावर दूसरीकड आपल्याला घ्येनार का कामासाठी नाही न मंग येवढी मोट्टी जाहिरात देऊन बऱ्याच पोरांना ख्वोट आमिष दाखवून का बर लुबाडायच आणि त्यातुं कमाई पन काही फार न्हाई आनि बाहेरून येणार्र्या पोरांना परत राहयसाठी जागा अन येक वेळच जेवण याचा खर्च कोण भागवणार, उर्र्मट फक्त पोर नसत्यात तर ही जादा शिकलेली ढोर भी असत्यात त्यामुळे जनजागृती बरोबर सरकार आणि नोकरदार यांची जागृती पन व्हायलाच पाहिजे नाहीतर येव्हड्या मोट्ट्या देशात त्या नागरीकांनसाठीच नोकरी अन धंदा राहणार न्हाई मंग गुन्हेगार आपल्या पासून लांब न्हाई आनि व्हो मूर्ख बनतो तो तर मूर्ख ठरतोच पन त्याला मूर्ख करणारा लई महामूर्ख असतोया.
बर आता मुलाखत संपलिया, अंन कागुद हातात भेटलाय मला बाबा हिंग्रजी येत न्हाय मंग वाचा बरे त्या कागुदावर काय खरडलंय, तुमच्या कड पाठवतुया त्यो कागुद वाचा अंन मला सांगा म्हाराजा काय हाय ते ! तोवर ६ महीन उलटून गेल्यात अंन म्या दूसरीकड पुन्हा अशा कंत्राटी काम देणाऱ्या कंपनीच्या शोधात जातुया .......................