व्ह्य म्हाराजा !
आपण निवडून दिलेले सरकार कसा छान कारभार करती हाय, लोक आता हाय हाय करून मरत्यात तरी त्यांस्नी काय बी नाय, मागल्या वर्षी इलासराव मुख-मंत्री झाले अन बिचाऱ्या मुंबैस्नी ताज हाटेलावर अनि गेट मुंबई वर कसाब पाहुण्याने हल्ला केला, आता त्यांचे शेजारी असोकजी आदर्श सोसायटी प्रकरणात अडकले, कारगिल ला पाठवा त्यांना किंवा शहीद झालेल्या जवानांकडे सोपवा मग त्यांस्नी समजेल आपण पैसा कसा खाल्ला अनि कुठून खाल्ला.
त्या इलासरावांनी देखील प्रकरण अंगाशी येईल म्हणून राजीनामा देऊन स्वतचा बचाव केला, असोकजींना यांनेच सल्ला दिला असेल तरच सख्खे शेजारी दिसतात, या अशा पांढऱ्या खादी वेशातील गुंडांना अनि दरोडेखोरांना आपली माणसे मते देतात कशी, काय हिस्सा मिळतो काय सामान्य जनतेला अशा लोकांस्नी मत देऊन मग महागाई कशी कमी नाय झाली, काय घोटाळा काय हाय !
बर, आता हमेरीकेचा होबामा येणार हाय मंग त्याच्या स्वागताची तयारी लई झाक, तो येणार म्हणून आपले पोलीस आता त्यांची चाकरी करणार, रस्ते चकाचक व्होनार, पथारी वाल्यांना हटवणार, दारूच्या बाटल्या फुटणार आणि सगळे भ्रष्ट मंत्री व होबामा चीअर्स म्हननार...आणि सामान्य माणूस त्यांचा म्होर हूब राहून टाळ्या पिटणार, हुम्बैकर (मुंबईकर) तुम्ही बी त्याच आता सगात करा, नवीन मुखमंत्री व्हनारच हाय बुधवारी तो भी यांचाच भाऊबंद व्होनार, आता बगाना काल समदे आपले लाडके नेते दिल्लीतून गायब होते आणि संडे साजरा करत व्होते, मग चरकले आर देवा पुन्हा मुखमंत्री झालू तर जुने घोटाळे उघडे पडले तर, नका दिल्लीत राहू आणि सोनिया संगत नवीन गेम खेळू तोवर म्हराष्ट्राच व्हतय कल्याण.
मुखर्जी म्हनत्यात आदर्श प्रकरणी समदी कागुद पाहून ह्ब्यास (अभ्यास) करायला पुरेसा येळ पाहिजे आणि चर्चा कराइला पाहिजे, अवो सरकार एक सांगू का आपले शहीद जवान जर सीमेवर हेच म्हनले असते शत्रूला तर तुम्ही शीटावर बसू शकला असता का ? अता ह्ब्यास करायचे वय नाही तूमचे खुर्ची स्वोडा नाहीतर योग्य निकाल द्या, का तुमचा बी पब्लिकने अभ्यास घ्यायला पाहिजे.
म्हाराजा, लोकांस्नी जाग कर रे अता नाहीतर गरीब (मनाने व शक्तीने) जनतेचे हाल अजून व्होनार रे बाबा !
जय जय रघुवीर समर्थ !!!