Sunday, February 27, 2011

श्रीसमर्थांचे रामराया जवळचे मागणे ...


कल्याण मागणें रामा तुज ... 

श्री समर्थ रामदास आपल्या सर्वांना आता माहितच असतील. श्री समर्थ रामदास जेव्हा तपश्चर्या, पुरश्चरणात असताना आणि भारत भ्रमण करीत असताना त्यांनी जी करुणाष्टके रचली, ज्या चौपदी आहे त्यात श्रीरामरायाजवळ जे काही मागणे मागितले त्यातील पुढील काही चौपदी येथे देत आहे.














कोमळ वाचा दे रे राम । विमळ करणी दे रे राम ॥ ध्रु० ॥
प्रसंग ओळखी दे रे राम । धूर्तकळा मज दे रे राम ॥ १ ॥
हितकारक दे रे राम । जनसुखकारक दे रे राम ॥ २ ॥
अंतरपारखी दे रे राम । बहुजनमैत्री दे रे राम ॥ ३ ॥
विद्यावैभव दे रे राम । उदासीनता दे रे राम ॥ ४ ॥
मागों नेणें दे रे राम । मज न कळें ते रे राम ॥ ५ ॥
तुझी आवडी दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ॥ ६ ॥














संगीत गायन दे रे राम । आलापगोडी दे रे राम ॥ ध्रु० ॥
धातमाता दे रे राम । अनेक धाटी दे रे राम ॥ १ ॥
रसाळ मुद्रा दे रे राम । जाड कथा मज दे रे राम ॥ २ ॥
दस्तक टाळी दे रे राम । नृत्यकला मज दे रे राम ॥ ३ ॥
प्रबंध सरळी दे रे राम । शब्द मनोहर दे रे राम ॥ ४ ॥
सावधपण मज दे रे राम । बहुत पाठांतर दे रे राम ॥ ५ ॥
दास म्हणे रे सदगुण धाम । उत्तम गुण मज दे रे राम ॥ ६ ॥  














पावन भिक्षा दे रे राम । दीनदयाळा दे रे राम ॥ ध्रु० ॥
अभेदभक्ती दे रे राम । आत्मनिवेदन दे रे राम ॥ १ ॥
तद्रूपता मज दे रे राम । अर्थारोहण दे रे राम ॥ २ ॥
सज्जनसंगति दे रे राम । अलिप्तपण मज दे रे राम ॥ ३ ॥
ब्रह्मअनुभव दे रे राम । अनन्यसेवा दे रे राम ॥ ४ ॥
मजविण तूं मज दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ॥ ५ ॥



















ह्यावरून मी आत्ताच दासनवमी निमित्त २-३ दिवसाच्या मुक्कामात घेतलेला स्वानुभव. मी सज्जनगडावर श्री समर्थांच्या तसेच रामदासी संप्रदायाच्या सान्निध्यात होतो. वरील जे जे मागणे श्री समर्थांनी रामरायाजवळ मागितले आहे ते त्यांच्यात होतेच, परंतु त्यांनी जे काही रामदासी महंत तयार केले वा अथवा आत्ता जे जे आहेत त्यांच्या सर्वांतच ते सर्व गुण तयार केले आहेत. आत्मसात केले आहे. बिंबवले आहेत.

बाहेरील समाजात वा व्यवहारात आजकाल personality development चे अनेक क्लासेस , कोर्सेस आहेत. पण श्री समर्थ रामदास स्वामींनी ह्या सर्व अभ्यासक्रम ४००-४५० वर्षांपूर्वीच मांडून दिलेला आहे. मग certificate च्या नावावर पैसा कशाला खर्च करायचा, त्यापेक्षा ग्रंथराज दासबोध वाचला नीट अभ्यासला आणि आचरण केले कि सहज प्राप्त आहे. स्वामी विवेकानंदाचे रामकृष्ण मिशन हे पण असेच आहे.
personality development चे अगदी विद्यापीठ आहे. 

वामराव पै पण म्हणतात " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. "
जो रामदासी आहे, तो उत्तम भजन करू शकतो, तो उत्तम कीर्तन करू शकतो. भगवदभजनात ते उत्तम प्रकारे तल्लीन होतात. परमेश्वराची उपासना, पूजन उत्तम करतो. तो उत्तम वाद्य (तबला, पेटी व टाळ) वाजवू शकतो. उत्तम पाककला अवगत आहे. वेदांचे उत्तम ज्ञान आहे. त्यांचे पाठांतर उत्तम आहे. अनेक ग्रंथाचे उत्तम वाचन आहे. योग्य विचारांचे लेखन ते उत्तम प्रकारे करतात. तब्येत व शरीराने उत्तम आहेत. कोणताही किंतु मनात न बाळगता ते उत्तम रामरायाची सेवा करतात. 

हे सर्व पाहिल्यानंतर मी माझ्या अंतरंगात झाकून पहिले आणि दिसले कि मीच माझा घात करत आहे. आपण समर्थांचा भक्त म्हणवतो पण खरच त्यांच्या नेमक्या कोणत्या गोष्टी आपण पूर्णपणे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो ? हा सगळा अनुभव मनाला एक चटका देऊन जातो.

म्हणूनच श्री समर्थ दासबोधात  म्हणतात ,

" उत्तम , उदात्त ते ते घ्यावे , हिणकस , हीन ते ते टाकावे ,
जीवन आपुले करवुन घ्यावे , सफल, संपन्न "

बहुत करावी सेवा । भगवंत भजनीचा मेवा ।
उत्तम गुणे झिजवी देहा । या संगाने तोडी सर्व मोहा ॥ श्रीराम ॥

     
नक्कीच सुधारणा घडली पाहिजे ... 

Thursday, February 17, 2011

ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो !!!



...तर उद्रेक टळला असता !!!
१७ फेब्रुवारी २०११, गुरुवार  
म. टा. प्रतिनिधी

फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाल्याच्या मुद्द्यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या अंतर्गत काम करणा-या सायबर सेलच्या पेट्रोलिंग टीमला आंबेडकरांची बदनामी करणारे प्रोफाइल याआधीच सापडले होते. ते बंद करण्यासाठी १३ फेब्रुवारीला फेसबुकशी संपर्क साधला होता. पण अमेरिकेतून त्याला तात्काळ प्रतिसाद मिळाला नाही. दलित समाजातून याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर हे प्रोफाइल फेसबुकवरुन गायब झाले.

फेसबुकवर 'आय हेट आंबेडकर' अशी कम्युनिटी तयार करुन त्यात बाबासाहेबांच्या फोटोचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. याविरूद्ध आरपीआय आणि अन्य दलित संघटनांनी या आवाज उठवला. आता फेसबुकवर असले उपद्व्याप करणा-या भामट्याला अटक करा, या मागणीसाठी आरपीआय आंदोलन छेडणार आहे. बाबासाहेबांचा अपमान कराल तर याद राखा, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिला आहे. आमदार सुमंत गायकवाड यांनी फेसबुक बंद करण्याची मागणी,  गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे. बहुजन विद्यार्थी परिषदेनेही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

फेसबुक बदनामीप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकाराचा सूत्रधार कोण याचा तपशील येण्याची सायबर सेल वाट पाहात असून तो हाती आल्यानंतर दोषीवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सायबर क्राइम सेलच्या सूत्रांनी दिली आहे.



॥ श्रीराम ॥

आजची हि वरील बातमी वाचली, त्यात सोशल नेटवर्क द्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी आंदोलन. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे आता समाजाला चहूवर्णाची एकता, कल्पना व सहकार्य नकोय.

जसे ह्या परम वंदनीय गौतम बुद्धांच्या अनुयायांतील, भारताचे संविधान लिहिणारे वंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांचे जसे विकृत विडंबन चालले आहे तसेंच आपल्या उरल्यासुरल्या " हिंदू " धर्मातील कित्येक ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर देव-देवतां, राष्ट्रपुरुष, संत यांचे जाहीर विडंबन सुरु आहे. फार दु:खाने, जड अंत:कारणाने काही उदाहरणे येथे देत आहेत, त्यावरून कळेलच,

जेव्हा श्रीसमर्थांना रंडवा / रंडीबाज रामदास म्हणतात हे आपण ऐकून घेणार ???
स्वातंत्र्यवीर सावरकरांना संडासवीर , टिळकांना नावे भटमान्य ठेवतात.
बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर यांना नावे ठेवतात.
अहो अनाथांचा नाथ अश्या "एकनाथ महाराजांना" नावे ठेवतात.
अहो ज्याना आपण " माउली " म्हणतो अश्या "ज्ञानेश्वर माउली" नां नावे ठेवतात.
आतातर काय UPA सरकार नथुराम गोडसेंना terrorist म्हणून घोषित करण्याचे ठरवत आहे ?
काही नुकत्यास घडामोडीने update करत आहे , हे छायाचित्र पाहा, काय आहे 











( हे माझ्या मनाने तयार केलेले नाही )

आणि यांत जास्त पुढाकार आहे तो सर्व तरुण युवकांचा, शाळेतले शिक्षण अर्धवट घेऊन, कॉलेजचे लेक्चर अर्धवट टाकायचे आणि इथे सोशल नेटवर्कवर उगाच क्रांती करायला बसणें ह्यास योग्य दिशा मिळाली पाहिजे. आपण सोशल नेटवर्क च्या माध्यमातून काय विचार, चर्चा करतो हे यांचा घरी पण माहित नसावे कारण संस्कारांची कमी दिसून येतेच आहे.

आतां मला सांगा आपले हि देशप्रेम जागे व्हायला नको का ? रोज आपण आपापल्या देव-घरांत इष्ट देवतांची पूजा करतो, तर मग त्यांची बाहेर चाललेली विटंबणा पहावते तरी कशी ? याचाच अर्थ आपली श्रद्धा कमकुवत आहे का ? ह्या बातमीतून बोध घेऊन जागे होऊ !

चला आपण हि आपल्या संस्कृतीचे, देव-देवतांचे विडंबन रोखण्यास एकत्र येऊ !

साने गुरुजींचे स्मरण करुया व प्रेरणा घेऊ ,

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

॥ श्रीराम समर्थ ॥

Friday, February 11, 2011

समर्थ रामदास स्वामी व जगद्गुरु संत तुकाराम - नरदेह स्तवन


नरदेह स्तवन

महाराष्ट्र संतांची भूमी, महंतांची भूमी. या महाराष्ट्रात संतांची मांदियाळीच होती अन् आहे. ही परंपरा सुरु होते ती कैवल्यसम्राट ज्ञानेश्वर महाराजांपासून. यात अठरा पगड जातीचे संत होते. ब्राह्मण, मराठा, नाभिक, सुतार, सोनार, महार, चांभार, कसाई, वाणी. यां संतांनी महाराष्ट्रात भक्तीचे मळे फुलवले.
भक्तीच्या माध्यमातून नराचा नारायण केला. या भुमीत भक्ती अन् शक्ती युक्तीने एकत्रित नांदली. याच भुमीत संतांचे राजे ज्ञानेश्वर महाराज, तर राजांमधील संत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. देवांनाही हेवा वाटवा अशी ही भूमी.

इ. स. १६०८ मध्ये या महाराष्ट्रात नवल घडले. कालपुरुषही कालगणना करीत असताना थांबला असेल. या वर्षी दोन अवतारी पुरुषांचे अवतरण झाले. हे दोन महापुरुष म्हणजे राष्ट्र्गुरु समर्थ रामदास स्वामी जगद्गुरु संत तुकाराम महाराज. समर्थांचा जन्म जांबेचा, साधनेचे स्थान टाकळी नासिक, तर कार्यक्षेत्र कृष्णाखोरे. तुकाराम महाराजांचे जन्मस्थान, साधनास्थळ व कार्यक्षेत्र देहू. दोघांचे उपास्यदैवत भिन्न. समर्थांचे उपास्यदैवत प्रभू रामचंद्र, तर तुकोबारायांचे पांडुरंग. दोघांचे संप्रदाय पण भिन्न. समर्थांचा रामदासी संप्रदाय तर तुकोबांचा वारकरी संप्रदाय. वरपांगी हि भिन्नता असली, तरी अंतरंगातून ते एकाच होते. दोघांनी जळी-स्थळी-काष्टी पाषाणी नटलेल्या चैतन्याची अनुभूती घेतल्याने दोघांनी एकच विचार मांडले. समर्थ रामदास म्हणतात, " साधू दिसती वेगळाले । परि ते स्वरुपी मिळाले " दोघांच्या विचारांतील ऐक्य मांडण्याचा हा अल्पसा यत्न.

या पृथ्वीवर अनेक सजीव आहेत. परमेश्वराने माणसाला आगळावेगळा देह देऊन विचार करण्याचे व तो किंवा दानव होऊ शकतो. त्यालाच ठरवायचे आहे की, आपण GOD व्हावयाचे की DOG व्हावयाचे. देवत्वाच्या दिशेने प्रवास करण्याचे साधन म्हणजे हा नरदेह म्हणूनच हे संतद्वय नरदेहाचे स्तवन करतात.

श्री समर्थ रामदास
धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो ॥
जो जे की परमार्थ हो । तो तो पावे सिद्धीते ॥

देह परमार्थी लाविले । तरीच याचे सार्थक जाले ।
नाही तरी हे वेर्थचि गेले । नाना आघातें मृत्यूपंथे ॥

बहुत जन्माचा सेवट । नरदेह सापडे अवचट ॥
येथे वर्तावें चोखट । निती न्यायें ॥       

या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनाचेनि द्वारें ।
मुख्य सारासार विचारें । बहुत सुटलें ॥

या नरदेहाचेनि संमधे । बहुत पावले उत्तम पदे ।
अहंता साडुनि स्वानंदे । सुखी जाले ॥

जगद्गुरु श्री तुकाराम
मोलाचें आयुष्य वेचोनियां जाय । पूर्वपुण्ये होय लाभ याचा ॥
अनंत जन्मीचा शेवट पाहतां । नरदेह हातां आला तुझ्या ॥
करील तें जोडी येईल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागी ॥
सांचलिया धन होईल ठेवणें । तैसीं नारायण जोडी करा ॥
करा हरीभक्ती परलोकीं कामा । सोडवील यमा पासोनियां ॥
तुका म्हणे करा आयुष्याचें मोल। नका वेचूं बोल नामाविण ॥

सार्थ तुकारामाची गाथा अभंग क्र.. ३०२४

शरीर उत्तम चांगले । शरीर सुखाचे घोसुलें ॥
शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ॥
शरीर सकाळी शुध्द । शरीर निधीचाही निध ॥
शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यभागीं देव शरीर ॥
शरीरा दु:ख नेदावा भोग । न द्यावे सुख न करीं त्याग ॥
शरीर वोखटें ना चांग । तुका म्हणे वेग करीं हरिभजनी ॥

सार्थ तुकारामाची गाथा अभंग क्र.. ४११३


॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

     

Friday, February 4, 2011

हे थांबवता येईला का ?



जय जय रघुवीर समर्थ !!!

भारताच्या हिंदू संस्कृतीत अनेक संत, साधू , सज्जन व तसेच राष्ट्रप्रेमी क्रांतिवीर होऊन गेले. प्रत्येकाचे पंथ, बोली भाषा आणि मार्ग जरी वेगवेगळे असले तरी शिकवण अथवा कार्य एकच होते.
सध्या भारतीय परिस्थितीत महाराष्ट्रात मराठा, ब्राह्मणेत्तर समाज आणि ब्राह्मण यांच्या जो जातीय द्वेष पसरविण्याचे काम काही संघटना अतोनात श्रमाने करत आहे, अशा परिस्थितीत समवैचारिक देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी युवाशक्तीने एकत्र येऊन याचा सामना करून थोर राष्ट्रपुरुषांविषयी जे अत्यंत भयानक विडंबन चालविले आहे ते थांबवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आपण मुळात कोणत्याही इतिहासाच्या घटनेला साक्षी नसताना केवळ अंदाजांवर , तर्क-वितर्कांवरनवा इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत व तसे करून काही साध्य नाही हे समजले पाहिजे.

" छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी " हे तिन्ही हिंदू संस्कृतीचे राष्ट्रपुरुष होय. एक म्हणजे धर्माचा रक्षण करणारा निष्ठावान, कर्तुत्ववान,  " जाणता असा राजा " , तर संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे " श्रेष्ठ गुरु ", " विठ्ठल - पांडुरंग " भक्तीचे उत्कट उदाहरण, ज्यांची भजने - अभंगे आपण नेहमीच ऐकतो. त्यांची " तुकारामाची गाथा " धन्य आहे.

अशा थोर संतावर विडंबना करताना आपल्याला आपलीच लाज वाटली पाहिजे. आता यांव्यतिरिक्त उरले " श्रीसमर्थ रामदास " यांसुद्धा टीकेचे परमोच्च स्थान दिलेले आहे. 

या थोर संताचे कार्य, आयुष्य, साधना कधीच न अनुभवता त्याच्या वर टीका करणे अयोग्यच आहे. " श्री समर्थ रामदास " यांचे कार्य तर फारच मोठे आहे , होते. मुळातच लहान वयात श्रीराम भेटीची तगमग लागलेले श्री समर्थ रामदास बारा वर्ष तपश्चर्या करतात. त्यापुढील बारा वर्षे संपूर्ण भारत भ्रमण करून तत्कालीन देशस्थितीचा अभ्यास करतात. ज्यावेळेस आपल्या हिंदू लोकांची मंदिर पाडली मोडली जात होती त्यावेळेस श्री समर्थांनी हनुमंतांची, तुळजाभवानीची मंदिरे जागोजागी स्थापन करून बलोपासना, रामदासी संप्रदाय, निर्माण केले, महंत तयार केले. अवध्या महाराष्ट्रास जागृत केले. धर्मसत्ता व राज्यसत्ता यांचा संपूर्ण समन्वय साधून सशक्त तरुणांची मने भारून टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्व साधून स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाज संघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. समाजविषयीच्या अपर तळमळीतून समर्थांनी विपुल वाड:गमय निर्मिती केली. अनेक घराघरात " मनाचे श्लोक , मनोबोध " " सार्थ दासबोध " " आत्माराम " तसेच अनेक काव्य, साहित्य आणि अभंगवाणी आपण ऐकतो, पाहतो व जाणतो. जे नाही जाणत त्यांनी एकदा तरी संपूर्ण कोणत्याही ग्रंथाचा सखोल अभ्यास करून मगच बोलावे.

मुळात आपण त्यांच्या नावातील साधा सरळ अर्थ समजून घेत नाही " समर्थ राम आहे त्याचे मी दास्यत्व करत आहे " ते  करुणाष्टकात म्हणतात " तुजवीण रामा मज कंठवेना " त्या तत्कालीन देशस्थितीत अनेक देव-देवतांच्या त्यांने आरत्या तयार केल्या अशा श्री समर्थ रामदासाचे कि ज्यांची श्रीराम भक्ती थोर, सर्वश्रेष्ठ आहे त्यांचे विडंबन म्हणजे क्षत्रिय कुलातील प्रभू श्री रामचंद्रांचे, श्री हनुमंतांचे आणि सर्व हिंदू देव- देवतांचे विडंबन होय. हे कोठेतरी थांबलेच पाहिजे कारण देव - देवतांबरोबर कोणाच्याहि वैयक्तिक श्रद्धेचे, भक्तीचे सगळ्याचेच विडंबन होय. राजकारण्यांनो आपल्या खुर्चीच्या व राजकीय सत्तेसाठी असा वापर करू नका. त्याची मुळे उपटून टाकायला वेळ नाही लागणार !

श्री समर्थ रामदास स्वामींनी सर्व साधू आणि संत लोकांवर जे काही प्रेम केले व आदर केला त्यातील एक छोटेसे उदाहरण खालील अभंगात पहा,
         
आमुचे सज्जन साधूजन ....
होय समाधान आमुचे तयांचेनि ...

तयांचेनि संगे पाविजे विश्रांती ...
साधू आदी अंगी सारीखेची ...
सारीखेची सदा संत समाधानी ...
म्हणोनिया मनी आवडती ...

आवडती सदा संत जिवलग ...
सुखरूप संग सज्जनांचा ...
सज्जनांचा संग पापाते संहारी ...
म्हणोनिया घरी रामदास ...

आमुचे  सज्जन संतसाधुजन
होय समाधान आमुचे

जय जय रघुवीर समर्थ !!!

Thursday, February 3, 2011

संत तुकाराम ! आक्षेप व खंडन - १



तुकाराम महाराज आक्षेप व खंडन, तुकाराम महाराज व ब्राम्हण :

ब्राम्हणांची निंदा व द्वेष हा विद्रोही विचारवंतांचा स्थायी भाव आहे. त्यांचा मागमुस ही तुकाराम महाराजांच्या साहित्यात नाही. आपण जसा चष्मा वापरतो तसे सर्व जग आपणाला दिसते. आपला चष्मा तर व्याभिचाराचा असेल तर तशी माणसे रामदास स्वामींसारख्या संतांवर देखिल व्याभिचाराचा आरोप लावतात. हा या चष्म्याचा गुण आहे. 

ब्राम्हणांत १) जातीचा ब्राम्हण, २) लक्षणाचा ब्राम्हण हे दोन प्रकर आहेत. तुकाराम महाराज हे या दोन्ही ब्राम्हणांचा आदर करवा असा उपदेश करतात. तुकाराम महाराज लक्षणाच्या ब्राम्हणाचे लक्षण सांगतात की ......

ब्राम्हण तो याती आंत्यज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ॥ 
रामकृष्ण नामे उच्चारी सरळ । आठवी सावळे रूप मनी ॥
शांती क्षमा दया अलंकार अंगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ॥
तुका म्हणे गेल्या षड उर्मी अंग । सांडूनिया मग ब्राम्हण तो ॥ 


अर्थ : जातिने अंत्यज असला तरई त्याचा आचारविचार शुद्ध आहे तो लक्षणाने खरा ब्राम्हण आहे हे निश्चित. याठिकाणी लक्षणाचा ब्राम्हण कोणता हे सांगुन ते ही पूज्य आहेत हे सांगितले आहे.

वैष्णवमुनी विप्रांचा सन्मान । करावा आपण होऊ नये ॥

याठिकाणी वैष्णवी, संत, ब्राम्हण, सन्यासी यांचा यथायोग्य, यथाशक्ती सत्कार करावा. पण आपण त्यांच्याकडुन सत्कार घेऊ नये. असे संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज हे ब्राम्हणद्वेष्टे नव्हते. उलट तुकाराम महाराज पुर्विच्या सर्व जातीतील संतांचा आदर करतात. संत, वारकरी, भक्त, याना जातिचे बंधण नसते. जो कोणी पंढरीची वारी करणारास वैष्णवांना, संताना हा आमच्या जातीचा नाही, त्यास माणायचे नाही असे म्हणेल तर तो वारकरी सांप्रदायीक विचारांचा मुळीच नाही. तसेच हे महाराज, संत, वारकरी आपल्या भागातील नाहीत त्यांचा आदर करू नये अशी शिकवण जर कोणी आपल्या अनुयायाना देत असेल तर ते क्षुद्र विचारांचे असुन वारकरी सांप्रदायीक म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत. संताना जातीची व भागाची बंधने नसतात. त्यांना जातीच्या बंधनात अडकवणे महापाप आहे. आणि जर संतांना जातीची बंधने असती तर ज्ञानेश्वर महाराजानी धरणेकर्‍यास तुकराम महाराजांकडे पाठवले नसते. शिवाय तुकराम महाराज जर जातियवादी असते तर त्यानी ज्ञानेश्वर महाराजांचे, एकनाथ महाराजांचे, श्रीसमर्थ रामदास स्वामिंचे वर्णन केले नसते. परंतु तुकराम महाराज तर ज्ञानेश्वर महारादी संतांचे तोंड भरून वर्णन करतात.

काय ज्ञानेश्वरि उणे । तिही पाठविली धरणे ॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायपे किंकरा ॥
ज्ञानियांचा राज गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥
मज पामरा काय ते थोरपण । पायीची वाहण पायी बरी ॥
तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली । म्हणोनी ठोविली पायी डोयी ॥ 


इत्यादी अभंगानी तुकाराम महाराजानी वर्णन केलेले आढळून येते. आणि तुकाराम महाराज जर ज्ञानेश्वर महाराजांचे आदी संतांस परमपूज्य मानतात तर हे विद्रोहीवाले मात्र ब्रम्हणद्वेषापोटी ज्ञानेश्वर महाराज आदी संतांचा द्वेष्करतात. कारण...

झविली महारे । त्याची व्याली असे पोरे ॥
करी संतांच मत्सर । कोपे उभारोनी कर ॥
बीज तैसे फळ । वरी आले अमंगळ ॥
तुका म्हणे ठावे । ऐसे झाले अनुभवे ॥ 


म्हणून तुकाराम महाराजांच्या साहीत्यात कोठे ही ब्राम्हणद्वेष अथवा ब्रम्हनांची निंदा दिसुन येत नाही. म्हणून त्याना "विद्रोही तुकाराम" य नावाने संबोधने महाहलकटपणा आहे.

जरी तो ब्राम्हण झाला कर्म भ्रष्ट ।
तरी तुका म्हणे श्रेष्ट तिही लोकी ॥
 

हे वचन विद्रोही विचारवंत संत रामदासांच्या नावावर सांगतात. व रामदासांना ब्राम्हणवादी ठरवतात. पण हे वचन तुकाराम महाराजांचे आहे. हा संपूर्ण अभंग पाहीला तर विद्रोही लोकांची दातखिळी बसेल.

दुधाळ गाढवी जरी झाली पाहे । पावेल काय धेनू सरी ॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे ॥
मर्कट आंघोळी लाविले टिळे । ब्राम्हणाचे लिळे वर्तू नये ॥
जरी तो ब्रम्हण झाला कर्म भ्रष्ट । तरी तुका म्हणे श्रेष्ट तिही लोकी ॥ 


विद्रोहीवाल्याना हा अभंग गैरसोईचा वाटला म्हणुन त्यना तो क्षेपक वाटला. काहीनी प्रश्नचिन्ह असावे असे अकलेचे तारे तोडले. पण विरामचिन्हे प्रचिन मराठीत नव्हती हे त्याना कोठून माहीत ! प्रश्नार्थक वाक्य सर्वनामावरुन ठरवले जाते, इथे कोठे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. शेवटचा सिद्धांत माणला तर हा अभंग काय म्हणतो याचा विचार या विद्रोहीवाल्यानी केलेला दिसत नाही. पण विद्रोहीवाल्यांची खोड आहे की आपल्या मतच्या विरोधी अभंग असेल तर तो प्रक्षीप्त आहे. ब्राम्हणानी आपल्या मतलबासाठी त्यात घुसडला आहे असे म्हणायचे.

जातीचा ब्राम्हण । न करी संध्या स्नान ॥
तो कशाचा ब्राम्हण । होय हीनाहून हिन ॥ 


तुकाराम महाराजांनी भ्रष्ट, भक्तिहीन ब्राम्हणाची निंदा केली आहे. म्हणुन ते विद्रोही ठरत नाहीत. कारण ब्राम्हणानी आपला स्वधर्म पाळावा असे संगण्याचे तात्पर्य आहे आणि अशा ब्राम्हणांची निंदा समर्थ रामदास स्वामी व ज्ञानेश्वर महाराज यांनी ही केली आहे. मग त्यानाही विद्रोही म्हणावो लागेल. उलट प्रत्येक वर्गाने आपले कर्म करावे असेच तुकोबाराय सांगतात.

वर्णाश्रम करीसी चोख । तरी तो पावशी उत्तम लोक ॥

तरीपण ईश्वराच्या भक्ति करिता वर्ण, जाती, आश्रम, यांची आडकठी नाही. सर्वाना अधिकार आहे. परमार्थात उच्च निच कोणी नाही. हा विचार ज्ञानेश्वर महाराजांपासुन तुकाराम महाराज पावेतो सर्व संतानी मांडला आहे.

सध्या तुकारामांना फक्त बहुजनांचे गुरु ठरवून त्यांच्या तोंडी ब्राह्मणांची निंदा करविण्याचे काम बीग्रेडीनी सुरु केले आहे. तुकाराम हे फक्त विशिष्ट जातीचे गुरु नव्हते तर ते जगद्गुरू होते. जेथे जेथे शक्य होईल तेंव्हा तेव्हा तुकाराम महाराजांनी लोकांना त्यांच्या जातीवार्ण प्रमाणे उपदेश केला आहे. ब्राह्मणांना ते ब्राह्मणाची कर्तव्ये करायला सांगतात तर कुणब्याला कुणब्याची.
 

आता खाली दिलेले अभंग पहा, हे तुकारामांच्या गाथेमधून उद्घृत केले आहेत.

हे वाचून तुम्ही असे म्हणाल का कि तुकाराम महाराज अल्ला के बंदे होते ?...

अभंग क्रमांक ४४३ :
अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । 
गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥

ख्याल मेरा साहेबका। बाबा हुवा करतार । 
व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥

जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । 
कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥

अभंग क्रमांक ४४४ :
अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे। 
अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥

मदऩ होये वो खडा फीर नामदऩकुं नहीं धीर । 
आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥

सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । 
इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥

जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । 
सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥

सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । 
गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥

मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । 
तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥

जय जय रघुवीर समर्थ !!!