...तर उद्रेक टळला असता !!!
१७ फेब्रुवारी २०११, गुरुवार
म. टा. प्रतिनिधी
फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाल्याच्या मुद्द्यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या अंतर्गत काम करणा-या सायबर सेलच्या पेट्रोलिंग टीमला आंबेडकरांची बदनामी करणारे प्रोफाइल याआधीच सापडले होते. ते बंद करण्यासाठी १३ फेब्रुवारीला फेसबुकशी संपर्क साधला होता. पण अमेरिकेतून त्याला तात्काळ प्रतिसाद मिळाला नाही. दलित समाजातून याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर हे प्रोफाइल फेसबुकवरुन गायब झाले.
फेसबुकवर 'आय हेट आंबेडकर' अशी कम्युनिटी तयार करुन त्यात बाबासाहेबांच्या फोटोचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. याविरूद्ध आरपीआय आणि अन्य दलित संघटनांनी या आवाज उठवला. आता फेसबुकवर असले उपद्व्याप करणा-या भामट्याला अटक करा, या मागणीसाठी आरपीआय आंदोलन छेडणार आहे. बाबासाहेबांचा अपमान कराल तर याद राखा, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिला आहे. आमदार सुमंत गायकवाड यांनी फेसबुक बंद करण्याची मागणी, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे. बहुजन विद्यार्थी परिषदेनेही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
फेसबुक बदनामीप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकाराचा सूत्रधार कोण याचा तपशील येण्याची सायबर सेल वाट पाहात असून तो हाती आल्यानंतर दोषीवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सायबर क्राइम सेलच्या सूत्रांनी दिली आहे.
॥ श्रीराम ॥
आजची हि वरील बातमी वाचली, त्यात सोशल नेटवर्क द्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी आंदोलन. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे आता समाजाला चहूवर्णाची एकता, कल्पना व सहकार्य नकोय.
जसे ह्या परम वंदनीय गौतम बुद्धांच्या अनुयायांतील, भारताचे संविधान लिहिणारे वंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांचे जसे विकृत विडंबन चालले आहे तसेंच आपल्या उरल्यासुरल्या " हिंदू " धर्मातील कित्येक ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर देव-देवतां, राष्ट्रपुरुष, संत यांचे जाहीर विडंबन सुरु आहे. फार दु:खाने, जड अंत:कारणाने काही उदाहरणे येथे देत आहेत, त्यावरून कळेलच,

जेव्हा श्रीसमर्थांना रंडवा / रंडीबाज रामदास म्हणतात हे आपण ऐकून घेणार ???
स्वातंत्र्यवीर सावरकरांना संडासवीर , टिळकांना नावे भटमान्य ठेवतात.
बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर यांना नावे ठेवतात.
अहो अनाथांचा नाथ अश्या "एकनाथ महाराजांना" नावे ठेवतात.
अहो ज्याना आपण " माउली " म्हणतो अश्या "ज्ञानेश्वर माउली" नां नावे ठेवतात.

आतातर काय UPA सरकार नथुराम गोडसेंना terrorist म्हणून घोषित करण्याचे ठरवत आहे ?
काही नुकत्यास घडामोडीने update करत आहे , हे छायाचित्र पाहा, काय आहे
( हे माझ्या मनाने तयार केलेले नाही )
काही नुकत्यास घडामोडीने update करत आहे , हे छायाचित्र पाहा, काय आहे
( हे माझ्या मनाने तयार केलेले नाही )
आणि यांत जास्त पुढाकार आहे तो सर्व तरुण युवकांचा, शाळेतले शिक्षण अर्धवट घेऊन, कॉलेजचे लेक्चर अर्धवट टाकायचे आणि इथे सोशल नेटवर्कवर उगाच क्रांती करायला बसणें ह्यास योग्य दिशा मिळाली पाहिजे. आपण सोशल नेटवर्क च्या माध्यमातून काय विचार, चर्चा करतो हे यांचा घरी पण माहित नसावे कारण संस्कारांची कमी दिसून येतेच आहे.
आतां मला सांगा आपले हि देशप्रेम जागे व्हायला नको का ? रोज आपण आपापल्या देव-घरांत इष्ट देवतांची पूजा करतो, तर मग त्यांची बाहेर चाललेली विटंबणा पहावते तरी कशी ? याचाच अर्थ आपली श्रद्धा कमकुवत आहे का ? ह्या बातमीतून बोध घेऊन जागे होऊ !
चला आपण हि आपल्या संस्कृतीचे, देव-देवतांचे विडंबन रोखण्यास एकत्र येऊ !
साने गुरुजींचे स्मरण करुया व प्रेरणा घेऊ ,

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
॥ श्रीराम समर्थ ॥