Friday, February 4, 2011

हे थांबवता येईला का ?



जय जय रघुवीर समर्थ !!!

भारताच्या हिंदू संस्कृतीत अनेक संत, साधू , सज्जन व तसेच राष्ट्रप्रेमी क्रांतिवीर होऊन गेले. प्रत्येकाचे पंथ, बोली भाषा आणि मार्ग जरी वेगवेगळे असले तरी शिकवण अथवा कार्य एकच होते.
सध्या भारतीय परिस्थितीत महाराष्ट्रात मराठा, ब्राह्मणेत्तर समाज आणि ब्राह्मण यांच्या जो जातीय द्वेष पसरविण्याचे काम काही संघटना अतोनात श्रमाने करत आहे, अशा परिस्थितीत समवैचारिक देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी युवाशक्तीने एकत्र येऊन याचा सामना करून थोर राष्ट्रपुरुषांविषयी जे अत्यंत भयानक विडंबन चालविले आहे ते थांबवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आपण मुळात कोणत्याही इतिहासाच्या घटनेला साक्षी नसताना केवळ अंदाजांवर , तर्क-वितर्कांवरनवा इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत व तसे करून काही साध्य नाही हे समजले पाहिजे.

" छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी " हे तिन्ही हिंदू संस्कृतीचे राष्ट्रपुरुष होय. एक म्हणजे धर्माचा रक्षण करणारा निष्ठावान, कर्तुत्ववान,  " जाणता असा राजा " , तर संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे " श्रेष्ठ गुरु ", " विठ्ठल - पांडुरंग " भक्तीचे उत्कट उदाहरण, ज्यांची भजने - अभंगे आपण नेहमीच ऐकतो. त्यांची " तुकारामाची गाथा " धन्य आहे.

अशा थोर संतावर विडंबना करताना आपल्याला आपलीच लाज वाटली पाहिजे. आता यांव्यतिरिक्त उरले " श्रीसमर्थ रामदास " यांसुद्धा टीकेचे परमोच्च स्थान दिलेले आहे. 

या थोर संताचे कार्य, आयुष्य, साधना कधीच न अनुभवता त्याच्या वर टीका करणे अयोग्यच आहे. " श्री समर्थ रामदास " यांचे कार्य तर फारच मोठे आहे , होते. मुळातच लहान वयात श्रीराम भेटीची तगमग लागलेले श्री समर्थ रामदास बारा वर्ष तपश्चर्या करतात. त्यापुढील बारा वर्षे संपूर्ण भारत भ्रमण करून तत्कालीन देशस्थितीचा अभ्यास करतात. ज्यावेळेस आपल्या हिंदू लोकांची मंदिर पाडली मोडली जात होती त्यावेळेस श्री समर्थांनी हनुमंतांची, तुळजाभवानीची मंदिरे जागोजागी स्थापन करून बलोपासना, रामदासी संप्रदाय, निर्माण केले, महंत तयार केले. अवध्या महाराष्ट्रास जागृत केले. धर्मसत्ता व राज्यसत्ता यांचा संपूर्ण समन्वय साधून सशक्त तरुणांची मने भारून टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्व साधून स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाज संघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. समाजविषयीच्या अपर तळमळीतून समर्थांनी विपुल वाड:गमय निर्मिती केली. अनेक घराघरात " मनाचे श्लोक , मनोबोध " " सार्थ दासबोध " " आत्माराम " तसेच अनेक काव्य, साहित्य आणि अभंगवाणी आपण ऐकतो, पाहतो व जाणतो. जे नाही जाणत त्यांनी एकदा तरी संपूर्ण कोणत्याही ग्रंथाचा सखोल अभ्यास करून मगच बोलावे.

मुळात आपण त्यांच्या नावातील साधा सरळ अर्थ समजून घेत नाही " समर्थ राम आहे त्याचे मी दास्यत्व करत आहे " ते  करुणाष्टकात म्हणतात " तुजवीण रामा मज कंठवेना " त्या तत्कालीन देशस्थितीत अनेक देव-देवतांच्या त्यांने आरत्या तयार केल्या अशा श्री समर्थ रामदासाचे कि ज्यांची श्रीराम भक्ती थोर, सर्वश्रेष्ठ आहे त्यांचे विडंबन म्हणजे क्षत्रिय कुलातील प्रभू श्री रामचंद्रांचे, श्री हनुमंतांचे आणि सर्व हिंदू देव- देवतांचे विडंबन होय. हे कोठेतरी थांबलेच पाहिजे कारण देव - देवतांबरोबर कोणाच्याहि वैयक्तिक श्रद्धेचे, भक्तीचे सगळ्याचेच विडंबन होय. राजकारण्यांनो आपल्या खुर्चीच्या व राजकीय सत्तेसाठी असा वापर करू नका. त्याची मुळे उपटून टाकायला वेळ नाही लागणार !

श्री समर्थ रामदास स्वामींनी सर्व साधू आणि संत लोकांवर जे काही प्रेम केले व आदर केला त्यातील एक छोटेसे उदाहरण खालील अभंगात पहा,
         
आमुचे सज्जन साधूजन ....
होय समाधान आमुचे तयांचेनि ...

तयांचेनि संगे पाविजे विश्रांती ...
साधू आदी अंगी सारीखेची ...
सारीखेची सदा संत समाधानी ...
म्हणोनिया मनी आवडती ...

आवडती सदा संत जिवलग ...
सुखरूप संग सज्जनांचा ...
सज्जनांचा संग पापाते संहारी ...
म्हणोनिया घरी रामदास ...

आमुचे  सज्जन संतसाधुजन
होय समाधान आमुचे

जय जय रघुवीर समर्थ !!!