लोक लोकसंख्या कमी करणार नाहीत ! बरोबर, मग पुढे हेच होणार
महागाई कमी होणार नाही, रस्त्यावरची रहदारी कमी होणार नाही, देशातली बेरोजगारी कमी होणार नाही व त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण मात्र वाढेल, नेते मंडळी त्यांची सत्तेची स्पर्धा सोडणार नाहीत आणि आपण डोळे उघडे ठेवून मतदान करणार नाही व योग्य नेता निवडणार नाही. समाजाची सुधारणा होणार नाही.
बर ! पुन्हा आतंकवाद / दहशतवाद हि अडचण आहेच, ती फक्त जातीयवादाची नसुन प्रत्येकजण स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत राहणार काही षंढ होऊन बघत बसतात.
सर्व सामान्य माणसांचे हेच ! सत्ते विरुद्ध आवाज न उठवता त्याने निडून दिलेल्या सरकार आणि आसपासची जीवन विरोधक होणारी परिस्थिती यातच संपून जाणार.
सहनशक्ती आणि षंढपणा यातला फरक ओळखला पाहिजे आणि राजकारणात नेता निवडून दिल्यावर तो जर देशाचा, शहराचा किंवा गावाचा विकास न करता पैसे खात असेल तर प्रथम आपण त्या नेत्याची चांगलीच भरभराट (भरभराट = गाढवावरून आणि चपलाहार घालून तोंडाला काळा रंग फासून मिरवणूक) घडवून आणली पाहिजे.
पुन्हा यात एक नवीन प्रश्न म्हणजे नेते लोकांना संरक्षण देण्यासाठीच पोलीस / RPF आणि इतर दलांची नेमणूक केली आहे का ? प्रत्येक नेत्यांनी आपल्या शहराचा आणि गावाचा नीट विकास केला तर जी जनता आहे त्याच्या संतप्त जमावात बदल होणार नाही आणि मग नेते मंडळींना सुरक्षा यंत्रणेची फारशी गरज राहणार नाही नाहीतर काय पोलीस सुद्धा नेते मंडळींना काही अपशब्द बोलल्यास अटक करतात नाहीतर बांबू मारतात.
गुन्हेगारी हि कमी झालीच पाहिजे त्यासाठी सर्व समाज मनात कोणतीही आढी / मतभेद न ठेवता एकत्र आला पाहिजे, नोकरी म्हणा व्यवसाय म्हणा काहीतरी रोजगार या बेकार तरुणांना सरकारने तसेच सर्वांने नीट दिला तर गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल याहूनही नाही झाली तर मग शिक्षा करा कि पुन्हा या वृत्तीने डोक वर केले नाही पाहिजे. नाहीतर काय अजून दुसरा कसाब, हेडली आपल्यापासून लांब नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी सुरु असलेली नेतेमंडळींची स्पर्धा आणि एकमेकांच्या पक्षांचे केलेले कौतुक.
व्यक्तिगत कौटुंबिक वादाचे हे व्यासपीठ नव्हे तो घरी ठेवून समाज हितकारक, निष्ठावान नेता तयार झाला पाहिजे जो खरोखर प्रजेला समान न्याय देऊन उत्तम शासन करेल याउलट छत्रपती शिवाजी महाराजांचा "भगवा" हातात घेवून सत्तेसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न हा त्यांचा आणि भगव्याचा घोर अपमान आहे.
शिका आणि शिकवा ! अतुल्य : भारत