Tuesday, October 19, 2010

कसाब, आपण आणि कायदा सुव्यवस्था


सुनावणीवेळी कसाबचा थयथयाट
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - न्यायालयात सतत हातवारे करणारा पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब आज न्यायालयात वकिलाशी बोलू न दिल्यामुळे तणतणत वेब कॅमवर थुंकला. त्याच्या या वर्तनाबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे सुनावले. तसेच त्याची मर्जी असेल तर त्याने सुनावणीला यावे असेही ऐकविले. 
न्या. रंजना देसाई व न्या. आर. व्ही. मोरे यांच्या खंडपीठापुढे कसाबच्या फाशीच्या शिक्षेसंबंधीच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. कसाबला ऑर्थर रोड कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर केले जाते. आज सकाळपासूनच तो कारागृहातील पोलिसांबरोबर हुज्जत घालताना आणि मध्येच गाणी म्हणताना दिसत होता. मध्येच त्याने, न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची मागणी न्यायालयाकडे केली. दुपारी दोन्ही न्यायमूर्ती उठल्यानंतर कारागृहातून पोलिस निरीक्षक काकडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधून सांगितले की, कसाबला त्याच्या वकिलांशी बोलायचे आहे. मात्र, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, येथे बोलता येणार नाही, घेऊन जा त्याला, असे सांगितले. यावर भडकलेल्या कसाबने आरडाओरड केला आणि वेब कॅमवर थुंकला. दुपारच्या सत्रात याबाबतची तक्रार निकम यांनी न्यायालयाकडे केली. दरम्यान, कसाब एकटा राहत असल्यामुळे तो संभ्रमित झाला असावा, असे वाटते, अशी प्रतिक्रिया त्याचे वकील अमीन सोलकर यांनी दिली.

सुरक्षेच्या कारणामुळे तुला न्यायालयात उपस्थित करणे शक्‍य नाही, त्यासाठीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था केली आहे, असे न्या. देसाई यांनी कसाबला सांगितले. तरीही कसाबचा तोरा कमी होत नव्हता. माझ्यावर काय आरोप आहे? मला न्यायालयात का नेत नाही? मग अमेरिकेला पाठवून द्या, अशी विधाने करीत तो निघून गेला. त्याच्या या वागणुकीबाबत त्याच्या वकिलांनी त्याच्याशी बोलावे, असे खंडपीठाने सांगितले. ही काही खटल्याची सुनावणी नाही. त्यामुळे आरोपीबरोबर आम्ही बोलायला हवे असे नाही. रिवाजाप्रमाणे फाशीच्या शिक्षेत आरोपीची उपस्थिती आवश्‍यक असते. त्यामुळे त्याला हजर केले आहे. जर त्याची इच्छा नसेल तर त्याला सुनावणीला आणू नका, कारागृहातच ठेवा, असे आदेश न्यायालयाने तुरुंगाधिकाऱ्यांना दिले. निकम यांनी आज कामा रुग्णालयातील व बाहेरील गोळीबारासंबंधीच्या साक्षीदारांबाबत युक्तिवाद केला.

कसाब काय म्हणालान्या. - क्‍या आप सुन सकते हो?
कसाब - सुन सकते है बहोत अच्छी तरह से...
न्या. - आप आराम से सुनवाई देख लेना, पुलिस को तंग मत करना, शाम को आप के वकील आपसे मिलेंगे।
कसाब - यहां कोई फॅसिलिटी नही दी है, आप देख सकते है, किस बात की सुनवाई चल रही है? मुझे बाहर की हालत से वाकिफ क्‍यो नही किया जा रहा है? आप जानते है क्‍या?
न्या. - शाम को आप के वकील आप से बात करेंगे।
कसाब - नही, मुझे यहॉं नही आना, मुझे अमेरिका भेज दिजीए... 
आपण सर्वांनी वाचलीच असेल, या भारत भूमीत प्रथम अतिरेकी कोण हा प्रश्न पहिला तर यात आपण सर्व सुद्धा मोडू शकतो कारण इतके दिवस त्या हरामखोरावर खटला चालू असून देखील कायदा आणि सुव्यवस्था तसेच भारत सरकार यांचा जावई किंवा अक्षरशः मुलगा असल्या सारखे त्याची काळजी घेतात परंतु कोर्टाचा निकाल काही लागला तरी कॅमेरा वर थुंकला म्हणजे बापाचा तोंडावर थुंकला नाही का, मग आता तरी त्याच्या बापाने कडक कारवाई करणे अपेक्षित नाही का ? का पुन्हा सापाला दुध पाजून स्वतः त्याचाकडून दंश करून घ्यायचा आहे का?   
अरे आता तरी जागे होऊ या, का आपल्या कामात, संसारात आणि खासगी आयुष्यातून आपला देशाकरता आपल्या शहराकरता काहीच का करायची इच्छा नाही का? आपण सर्व हिजडे आहोत का निव्वळ घरात बसून पेपर अथवा बातम्या लाऊन बसायचे आणि चर्चा करायची फार बिकट परिस्थिती आहे देशाची, पण हे विसरायला नको कि त्यात आपला पण हातभार आहे, राष्ट्र याकरता काहीच करायचे नसेल तर निव्वळ भारतीय नागरिकत्व आहे म्हणून आणि इथे जन्माला आलो म्हणून निवास करायचा आहे का? फार वेळ नाही मागत आपला देश कारण आपली लोकसंख्या मात्र सर्वांना माहित आहे तेव्हा विचार न करता कार्याला लागणे महत्वाचे.....
जय जय रघुवीर समर्थ !!